Breaking News

बरेवाईट झाल्यास मीच जबाबदार अण्णा हजारे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


पारनेर/ प्रतिनिधी ः
मला कोणतीच सुरक्षा व्यवस्था नको. मला दिलेले पोलिस संरक्षण काढून घ्यावे. माझे काही बरेवाईट झाले तर त्याला मीच जबाबदार राहीन, असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
महिला सुरक्षेच्या विविध मागण्यांसाठी हजारेंनी मौनव्रत सुरु केलेले आहे. शुक्रवारी त्यांनी पोलिस संरक्षणही नाकारले आहे. त्यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले आहे. मौनव्रताच्या सातव्या दिवशी पारनेर, मुंबई, राजस्थान, सोनईमधील कार्यकर्त्यांनी राळेगण सिद्धी येथे हजेरी लावली.
   महिलांच्या सुरक्षिततेसाठी देशभरात हेल्पलाईन सुरू करावी, महिला अत्याचार प्रकरणी न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात लवकर सुनावणी होऊन दोषींना शिक्षा घ्यावी यासह काही प्रश्‍नांबाबत हजारे यांनी शुक्रवारपासून राळेगणसिद्धीत मौन आंदोलन सुरू केले आहे. गुरुवारी सकाळी डॉ. सादिक राजे यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज च्या प्रा. मनीषा पंडित, पूनम खोसे, यांच्यासह प्रियंका गुंड, गायत्री रणशिंग, क्रांती माटे, कांता पथवे, सोनाली मधे, शुभांगी भागवत, रोहिणी मोरे, वैशाली बारामते, अंबिका खोरे, आरती शिंदे, दुर्गा आहेर, स्मिता बांडे, अंजूम शेख, शिवांजली लवांडे, आकांक्षा सोनवणे, सोनाली कांगुणे, दीपाली पंडित, ऋतुजा गायकवाड, तेजस्विनी कामजे आदींसह राजस्थान, मुंबई येथील कार्यकर्त्यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवला. यावेळी संदीप पठारे, अमोल झेंडे, मेहबूब शेख, श्याम पठाडे आदी उपस्थित होते.