Breaking News

बंदीवानांनी सकारात्मकता रुजवावी :सावंत जिल्हा कारागृहातील बंदीवानांना ख्रिसमसनिमित्त ब्लँकेट वाटप अहमदनगर/प्रतिनिधी
 मनुष्याने नेहमीच स्वत:च्या हातून घडलेल्या पापासाठी क्षमायाचना केली पाहिजे. त्यातून परिवर्तन झाल्याचे दिसून येईल, असा संदेश प्रभू येशू ख्रिस्तांनी दिलेला आहे. प्रभू येशूंचे हेच विचार समाजासाठी  तारक आहेत. बंदीवानांनीही कळत-नकळत झालेल्या चुकांचे चिंतन करून मनात सकारात्मकता रुजवावी. स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून आणावा, असे प्रतिपादन अधीक्षक एन.जी.सावंत यांनी केले.
 ख्रिसमसच्या सणानिमित्त मिशन सत्य वचन जीवंत हंगाम मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्हा कारागृहातील बंदीवानांना ब्लँकेटची भेट देण्यात आली. या वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी संजीव पाटोळे, सिनिअर जेलर शामकांत शेडगे, पत्रकार किरण बोरुडे, पास्टर राजू आल्हाट, संदीप ठोंबे , राजू भिंगारदिवे, आयुष पाटोळे, गौतम विधाते (दाजी),  राहुल विधाते, योगेश शिंगाडे, अक्षता पाटोळे, संगिता पाटोळे, कोमल मोहिते आदी उपस्थित होते.
  तुरुंगाच्या 'सुधारणा पुनर्वसन' या ब्रीदवाक्यानुसार बंदीवानांसाठी विविध माध्यमातून उपक्रम राबविण्यात येतात. ख्रिसमसच्या सणानिमित्त बंदीवान बांधवांना उबदार ब्लँकेटचे वाटप पाटोळे त्यांच्या सहकार्यांनी केले तसेच बंदीवानांना प्रभू येशूचा संदेशही दिला. अशा उपक्रमातून बंदीवानांना नव्याने उभारी घेण्यासाठी आवश्यक ते मानसिक बळ निश्चित मिळेल, असा विश्वास कारागृह अधीक्षक एन.जी.सावंत यांनी व्यक्त केला.