Breaking News

नेवासे तहसीलवर विविध पक्षांचा मोर्चा


नेवासे/प्रतिनिधी ः
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ सोमवारी तहसील कार्यालयावर विविध पक्ष व सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. भारत माता की जय, वंदे मातरम... अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
        तहसीलदार रुपेश सुराणा व पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, संसदेमध्ये पारित झालेल्या एनआरसी व सीएबी 2019 या विधेयकाला आम्ही भारताचे सुजाण नागरिक म्हणून पाठिंबा देत आहोत.
           यावेळी अमृतानंद कांकरिया महाराज, अण्णासाहेब अंबाडे, डॉ. लक्ष्मण खंडाळे, नेवासा बुद्रुकचे माजी सरपंच दादासाहेब कोकणे, नगरसेवक सुनील वाघ, ज्ञानेश्‍वर पेचे, नगरसेवक दिनेश व्यवहारे, भारत डोकडे, राजेंद्र मापारी, दीपक गायकवाड, संजीव शिंदे, सतीश गायके, दीपक परदेशी, अभिषेक गाडेकर, नचिकेत कुलकर्णी, आकाश शेटे, प्रसाद लोखंडे, नितीन जगताप, उमेश शिंदे, नवनाथ जाधव, कृष्णा डहाळे, अजितसिंग नरुला, आदेश मोटे, मनोज डहाळे, निखिल शिंगी, अनिकेत मापारी, शिवा राजगिरे, आशिष कावरे, रुपेश उपाध्ये, दिनेश विखोना, पप्पू पवार उपस्थित होते. या निवेदनावर शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.