Breaking News

संगणक क्षेत्रात विविध प्रकारच्या संधी उपलब्ध

अहमदनगर/प्रतिनिधी : “संगणक हे आज विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या व्यक्तिसमुहाद्वारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे. एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. टेक्नो म्युटेशन हे नुसते प्रदर्शन नसून संगणक क्षेत्रातील विविध उपलब्ध संधी व विद्यार्थ्यांच्या संगणकीय कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढवण्यासाठी त्यांच्या जिज्ञासेला त्यांच्या कौशल्याला वाट मिळवण्यासाठी आणि नवनवीन उपक्रम की जे गणित विज्ञान संगणकाच्या माध्यमातून विद्यार्थी प्रस्तुत करू शकत असेल अशा विद्यार्थ्यांसाठी  हे एक मोठं स्वप्नच जणू बनलं आहे’’, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी केले आहे.
अहमदनगर महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागात ‘टेक्नो म्युटेशन ’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये महाविद्यालयातील तसेच नगर शहरातील इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. बी.एम. गायकर,  उपप्राचार्य प्रा. डॉ. ए.व्ही. नागवडे, उपप्राचार्य प्रा. डॉ. सय्यद रझाक, डॉ. एन.आर.सोमवंशी, डॉ. वेगास सॅवियो, प्रा. डॉ. डी.बी. मोरे, रजिस्ट्रार ए. वाय. बळीद आदी उपस्थित होते.
यावेळी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात संगणक शास्त्रातील नवीन माहिती तसेच गणित, विज्ञानाची माहिती, विविध प्रकल्प, पीपीटीज्, खेळ, कोडी पोस्टर्स मार्फत मांडले होते. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य होते.
या स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी विजेते झालेे. यामध्ये न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, समर्थ विद्या मंदिर, भाऊसाहेब फिरोदिया व ज्युनिअर कॉलेज, रुपीबाई मोतीलाल बोरा ज्युनिअर कॉलेज, जय बजरंग महाविद्यालय, बाणेश्‍वर महाविद्यालय, प्रगत महाविद्यालय, दादासाहेब रुपवते ज्युनिअर कॉलेज, मार्कंडेय विद्यालय, चाँद सुलताना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, अहमदनगर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यतिमखाना, अल्हाज शेख अझिज उर्दू ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स आलमगिरी अहमदनगर, महर्षी ग.ज.चिंदबर विद्या मंदिर, सेंट सेव्हीअर ज्युनिअर कॉलेज, अहमदनगर महाविद्यालय आदी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
सूत्रसंचालन निवेदिता वाघमारे यांनी केले तर आभार  डॉ. सय्यद रझाक यांनी मानले.