Breaking News

माहेश्वरी सभेच्या आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


अहमदनगर / प्रतिनिधी
नगर तालुका माहेश्वरी सभा अहमदनगरच्यावतीने आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल पुणेच्या सहकार्याने रामचंद्र खुंट येथील धूत हॉस्पिटलमध्ये आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराचे उद्घाटन माहेश्वरी सभा जिल्हाध्यक्ष अनिष मनियार, डॉ. आर. आर. धूत  यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा माहेश्वरी सभेचे सचिव अजय जाजू, तालुकाध्यक्ष विनोद मालपाणी, आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे डॉ. सुभाष मुनोत, मुकुंद धूत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष मनियार म्हणाले की, सामाजिक मानसिक स्वास्थ्यासाठी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. महिलांचे आरोग्य उत्तम असेल तर संपूर्ण परिवाराचे आरोग्य उत्तम राहते. यासाठी अशा आरोग्य शिबिरांची नितांत गरज आहे. डॉ. धूत म्हणाली, की शिक्षण आरोग्य या दोन मुलभूत गोष्टीवर देशाची प्रगती अवलंबून आहे. त्यासाठी आवश्यक मुलभूत सुविधासाठी जास्त निधी शासनाने तरतूद करण्याची गरज आहे. जगात यासाठी होणाऱ्या खर्चाच्या निम्म्यापेक्षा कमी तरतूद असल्याची त्यांनी खंत व्यक्त केली.
प्रारंभी तालुकाध्यक्ष विनोद मालपाणी यांनी प्रास्ताविक स्वागत केले. या उपक्रमासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या श्यामा मंत्री यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मोहनलाल मानधना यांनी आरोग्य शिबीर उपक्रमाचे कौतुक केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी श्रीगोपाल धूत, मोहनलाल  मानधना, आर. डी. मंत्री, श्रीगोपाल जाखोटिया, ओमप्रकाश चांडक, जमनाभाभी काबरा, अजय नागोरी आदी उपस्थित होते. बहुमंडळ अध्यक्षा सुरेखा मनियार, किशोरी महिला मंडळ अध्यक्षा काजल गिल्डा, माहेश्वरी पंच ट्रस्ट, माहेश्वरी पंचायत सभा, माहेश्वरी युवक मंडळ, खाकीदास बाबा ट्रस्ट, माहेश्वरी प्रतिष्ठान, सारसनगर सावेडी यांचे शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद धूत यांनी करत सर्वांचे आभार मानले.