Breaking News

बिहारमध्ये काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या


बिहार : बिहारमध्ये काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी काँग्रेस नेते राकेश कुमार यादव यांची गोळ्या झाडून हत्या केली. शनिवारी सकाळी शहरातील सिनेमा रोडवर राकेश कुमार यांची हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी राकेश यादव नेहमीप्रमाणे जीमवर जात होते. त्याचवेळी जीमच्या बाहेर दुचाकीवरुन आलेल्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात राकेश यादव यांचा जागीच मृत्यू झाला.