Breaking News

वाळूची चोरटी वाहतूक करताना टेम्पो पकडला संगमनेर/प्रतिनिधी   
 संगमनेर तालुक्यातील मांडवे खुर्द फाटा याठिकाणाहून विनापरवाना बेकायदेशीरित्या दोन ब्रास वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर पोलिस उपअधिक्षक रोशन पंडीत यांच्यासह पथकाने कारवाई केली. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण लाख हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मांडवे खुर्द फाटा याठिकाणाहून शिवाजी लहानू  नाईकवाडी भागवत आबा कुदनर (दोघे रा. शिंदोडी, ता.संगमनेर) हे दोघे विनापरवाना बेकायदेशीररित्या टेम्पो (क्रमांक एमएच १७ बीडी ३१०३) मधून दोन ब्रास वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक रोशन पंडीत यांना समजली. त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली.यात एकूण लाख हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल दशरथ वायाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी वरील दोघांविरुद्ध गु..नं. भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सुरेश टकले हे करत आहेत.