Breaking News

युवाचार्य महेंद्रऋषी महाराजांचे आनंदधाम येथे भव्य स्वागत


अहमदनगर / प्रतिनिधी
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषी महाराज यांचे अतिशय लाडके परमशिष्य श्रमणसंघीय युवाचार्य पूज्य महेंद्रऋषी महाराज यांचे शनिवारी आनंदधाम येथे आगमन झाले. तत्पूर्वी सकाळी आनंदऋषी हॉस्पिटलजवळील यश पॅलेस चौकात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर ते आनंदधाम येथे दाखल झाले.
त्यांच्यासमवेत प्रवर्तक प्रकाशमुनी महाराज, उपप्रवर्तक अक्षयऋषी महाराज, पूज्य हितेंद्रऋषीजी महाराज, पूज्य अमृतऋषीजी महाराज, पूज्य दर्शनमुनीजी महाराज, पूज्य अचलऋषीजी महाराज आदिठाणा 7 हे साधूजन होते. आनंदधाम येथे सर्वांचे महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज, प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज आदी साधूंच्या सान्निध्यात स्वागत करण्यात आले.
यावेळी जैन श्रावक संघाचे सेक्रेटरी संतोष बोथरा, उपाध्यक्ष आनंदराम मुनोत सतीश (बाबूशेठ) लोढा, संतोष गांधी, सी. .रमेश फिरोदिया, सविता रमेश फिरोदिया, चांदमल ताथेड, कांतीलाल गुगळे, रतिलाल कटारिया, मनिषा मुनोत, नितीन शिंगवी, बाळू बोरा, अभय लुणिया, राजेश बोरा, अनिल दुगड, प्रितम गांधी, नगरसेविका मिना चोपडा, माजी नगरसेवक संजय चोपडा, श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक श्राविका उपस्थित होते.
दरम्यान, पूज्य महेंद्रऋषी त्यांच्यासमवेत असलेले गुरुभगवंत दि. जानेवारीपर्यंत आनंदधाम येथे विराजमान असणार आहेत. या काळात त्यांच्या अनमोल विचारांचा, मार्गदर्शनाचा पावन पवित्र सान्निध्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन जैन श्रावक संघाच्यावतीने करण्यात आले आहे.
चौकट
'आनंदधाम'ची विलक्षण अनुभूती अलौकिक
'आनंदधाम तथा नगरची भूमी ही गुरुभूमी आहे. याच भूमीत गुरुदेव आचार्यश्री आनंदऋषीजी महाराज यांच्याकडून अलौकिक ज्ञानाचे भांडार मिळाले. त्यामुळे नगरला येणे नेहमीच आनंद देणारे असते. आनंदधामच्या पवित्र पावन प्रांगणात आल्यावर येणारी विलक्षण अनुभूती अलौकिक असते.'
पूज्य महेंद्रऋषीजी महाराज.