Breaking News

वंचित बहुजन आघाडीकडून 24 जानेवारीला महाराष्ट्र बंद अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरेंची ’मातोश्री’वर भेट, तासभर चर्चा


मुंबई ः देशात बेरोजगारी मोठया प्रमाणावर वाढली असून, भविष्यात बेरोजगारीचा मोठा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे, या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या एनआरसी, एनपीए आणि सीएए कायद्याविरोधात 24 तारखेला महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तसेच या बंदमध्ये 35 संघटना सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. 24 जानेवारीला वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी बंदची हाक दिली आहे. त्यासंदर्भातच चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यासंदर्भातच भेट होती. त्यांनी आम्हाला विनंती केली की, जसे मागच्या वेळी दादर टीटीचे आंदोलन शांततेत घडले. त्याच शांततेत हे आंदोलन झाले पाहिजे, आम्हीसुद्धा त्यांना सांगितले की दादरचे जसे शांततेत आंदोलन झाले, तसेच आंदोलन आताही होणार आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. आर्थिक दिवाळखोरीसंदर्भात त्यांनी माहिती मागितली आणि मी त्यांना कळवलेले आहे. बजेटमध्ये 24 लाख कोटी जमतील असे शासनाने सांगितले. नोव्हेंबर महिन्यात इकोनॉमिक सर्व्हे ऑफ इंडियाचा जो रिपोर्ट आलेला आहे. त्या रिपोर्टनुसार फक्त 11 लाख कोटी जमलेत, अशी माहिती आहे. 1 फेब्रुवारीला बजेट सादर केलं जाईल. त्या दरम्यान 3 लाख कोटी न जमल्यास शासनाकडे शासन चालवण्यासाठी जो निधी लागतो तोसुद्धा उरणार नाही. लोक व्यवहार करत नाहीत आणि व्यवहार करत नसल्यानं शासनाला जो महसूल हवा आहे तो मिळत नाही. 24 जानेवारीला शांततेत बंद होईल.