Breaking News

स्वामी विवेकानंद आणि आजचा युवक

तल्लख बुद्धिमत्ता असलेले भारतीय संस्कृतीचे सखोल अभ्यासक स्वामी विवेकानंद यांचा 12 जानेवारी हा जन्मदिवस हा दिवस जागतिक युवादिन म्हणून साजरा होतो. आज स्वामी विवेकानंदांचे विचार पुन्हा एकदा नव्याने आत्मसाद करतानाच त्यांच्या विवेकशील मार्गाने रचनात्मक समाजनिर्मितीसाठी युवा वर्गाला मार्गदर्शन करण्याची गरज स्पष्ट होते. देशाचा विकास साधायचा असेल, दर देशाची पाळंमुलं भक्कम असणं गरेजचे आहे. बदलत्या काळात प्रवाहाच्या बरोबर चालत असताना आपल्या कृतीतून आणि आचरणातून या विकासाला जोड देणं म्हणजे खर्‍या अर्थानं देशप्रेम केवळ उपदेश करून नवहे, तर स्वतःच्या मेहनतीने आव्हानांना झेलण्याचे सामर्थ्य ठेवणारे स्वामी विवेकानंद एक तेजस्वी पुरुष म्हणून ओळखले जातात. कामासाठी वेळ द्या, कारण ती यशाची किंमत आहे. विचारासाठी वेळ द्या.


तल्लख बुद्धिमत्ता असलेले भारतीय संस्कृतीचे सखोल अभ्यासक स्वामी विवेकानंद यांचा 12 जानेवारी हा जन्मदिवस हा दिवस जागतिक युवादिन म्हणून साजरा होतो. आज स्वामी विवेकानंदांचे विचार पुन्हा एकदा नव्याने आत्मसाद करतानाच त्यांच्या विवेकशील मार्गाने रचनात्मक समाजनिर्मितीसाठी युवा वर्गाला मार्गदर्शन करण्याची गरज स्पष्ट होते. देशाचा विकास साधायचा असेल, दर देशाची पाळंमुलं भक्कम असणं गरेजचे आहे. बदलत्या काळात प्रवाहाच्या बरोबर चालत असताना आपल्या कृतीतून आणि आचरणातून या विकासाला जोड देणं म्हणजे खर्‍या अर्थानं देशप्रेम केवळ उपदेश करून नवहे, तर स्वतःच्या मेहनतीने आव्हानांना झेलण्याचे सामर्थ्य ठेवणारे स्वामी विवेकानंद एक तेजस्वी पुरुष म्हणून ओळखले जातात. कामासाठी वेळ द्या, कारण ती यशाची किंमत आहे. विचारासाठी वेळ द्या.

 कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे. खेळण्यासाठी वेळ द्या, कारण तो  तारुण्याचे गुपित आहे. वाचण्यासाठी वेळ द्या, कारण तो ज्ञानाचा पाया आहे. आणि स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे आणि अतिशय महत्त्वाचे दुसर्‍यासाठी वेळ द्या कारण ते नसतील, तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही. हे स्वामी विवेकानंद यांचे विचार. स्वामी विवेकानंदंचा तरुणांच्या क्षमतेवर प्रगाढ विश्‍वास म्हणजे त्यांच्या सामर्थ्यांची जाणीव त्यांना होती. तारुण्याच्या वाटेवर असताना अनेक आव्हानात्मक स्पर्धेला सामोरं जाणारा तरुण हा जग बदलवण्याची ताकद स्वतःमध्ये होती. ॠर्ळींश ाश र्हीपवीशव परलहळज्ञशींर रपव ख ुळश्र लहरपसश ींहश ुेीश्रव असं म्हणणार्‍या स्वामी विवेकानंदांना त्या काळातही तरुणांच्या शक्तीची कल्पना होती. एखाद्या ज्ञानानं समृद्ध होण्याआधी विषयी सखोल माहिती मिळवणं महत्त्वाचं आहे.
स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी विचार मानवी जीवनाची दिशा बदलून टाकतात. आणि यशाचा मार्ग गवसण्यासाठी उपयोगी ठरतात. आपल्या आयुष्यात एखाद ध्येय गाठायचे असेल तर त्याचीा जडणघडण ही लहानपणापासूनच पाहिजे. “उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचं ध्येय मिळत नाही.’’ हा संदेश स्वामी विवेकानंद यांनी तरूणांना दिला. स्वामी विवेकानंद म्हणजे योद्धा संन्यासी आणि तरूण पिढीचे अखंड प्रेरणास्त्रोत, ज्यांना फक्त भारतातल्या युवा पिढी समोरच नाही तर संपूर्ण जगातल्या युवा पिढीसमोर आदर्श ठेवला. सगळे देश भारताकडे मोठ्या आशेनं बघतात. का?..... कारण भारत एक संधीचा देश आहे. या देशात अनेक संधी आज वाट बघत आहेत. जग भारताकडे आशेने बघतंय कारण आज आपला देश सर्वात तरूण देश आहे. ज्या देशाची 65% लोकसंख्या तरूण असेल. 35 वर्षांच्या आतली असेल तो देश किती भाग्यवान आहे. आज आपल्या देशात किती तरी कोटी जनता युवा आहे. आणि जिथं तरूणाई असते ना, तिथं काही संकल्पना, सीमा नसतात. बंधने नसतात. कधी-कधी आपल्या देशात युवकांच्या वेगवेगळ्या व्याख्या ऐकायला मिळातात. प्रत्येकाचा दृष्टीकोन हा वेगवेगळा असतो. युवापिढी म्हणजे नव्या विचारांची आणि आधुनिकतेची सांगड घालून आपलं म्हणणं समाजापुढं मांडणारी नव्या जोशाची पिढी. आजचा तरूणच उद्याची दशा आणि दिशा ठरवणार आहे. पण आजच्या तरूणाईला गरज आहे. ती आदर्श विचारांची आणि कुशल नेतृत्त्वाची, “उेपर्षीीश“ झालेल्या तरूणांना मार्ग दाखवण्याची आज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पक्ष व इतर संघटना वेगवेगळ्या नावांनी केवळ नावापुरत्या अस्तित्त्वात आहेत. या संघटनांचा सहभाग समाज उन्नतीसाठी फारच कमी दिसून येतो. आजची राजकीय, सामाजिक, मानसिक आणि धार्मिक परिस्थिती पाहता मनातून वाटतं की तरुणांना मार्गदर्शन करण्याची व त्यांच्यातून कुशल नेतृत्व, परिपूर्ण व्यक्ती निर्माण करण्याची जबाबदारी खरोखरच स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवणार्‍या समाजसेवक, शिक्षक, पत्रकार आणि कार्यकर्त्यांची आहे. कारण देशाची मोठी ताकद असलेल्या तरुणांना जर असेच प्रभावहीन, नेतृत्वहीन  व दिशाहीन ठेवले तर उद्याचे चित्र आजच्यापेक्षा अधिक किचकट असणार आहे.
आजचा तरुण स्वतःला डिफरंट समजतो. त्याची मानसिकता ही ग्लोबल आहे. पण म्हणून डोळे झाकून कोणालाही फॉलो करु नका. आजचा तरुण स्मार्ट आहे. आणि असलंच पाहिजे. पण स्मार्टनेस आणि झगमगाट यातला फरक पण ओळखायला पाहिजे. आज फोटोजेनिक असून चालत नाही तर प्रतिमायुक्त असेल तरच प्राधान्य मिळते आणि हेच वास्तव आहे. व्यक्तिमत्त्व फुलवण्यासाठी केवळ करिअर, पैसा, ऐषआरामाची जिंदगी एवढंच महत्त्वाचं नाही तर आजूबाजूला घडणार्‍या गोष्टींविषयी विचारमंथन व स्वतःची भूमिका या गोष्टीदेखील आवश्यक आहेत. पण याकडे तरुणाई दुर्लक्ष करताना आपल्याला दिसते. जर असंच चालू राहिलं तर कसा बनेल स्मार्ट देश. तरुणाई म्हटलं की आठवतात ते स्वामी विवेकानंद आणि तरुणांबद्दलची त्यांची तळमळ. ते एक आदर्श गुरु आहेत. आजच्या तरुणाईला स्मार्ट बनण्यासाठी गरज आहे ती स्वामी विवेकानंदांच्या विचारांची. हा आता आपल्यातलं कोणीच विवेकानंद नाही बनू शकत, पण त्यांच्या दिशेवर नक्कीच चालू शकतो.  आजची तरुणाई त्यांच्या शैक्षणिक काळात त्यांचा अमूल्य वेळ हा फालतू गोष्टींवर खर्च करताना दिसतेय. कारण हा वेळ आपलं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा आहे. पण आजचा तरुण या वेळाचा गैरवापर करतोय. टीव्ही, मोबाईल, इंटरनेट ही मनोरंजनाची साधने आहेत. पण आजचा तरुण यांच्या आहारी गेला आहे. पण या माध्यमांमधून कोणती गोष्ट घ्यायची आणि कोणती नाही घ्यायची, हे आजच्या तरुणाला कळलं पाहिजे. तरुण पिढी देशाचा, समाजाचा आणि कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. तरुणांच्या हाताला काम मिळालं तरच आजचा तरुण सर्वांगीण विकास करु शकतात. तरुणांच्या हाताला काम नसेल तर तरुणाई भरकटते. दिशाहीन होते. आजच्या काळात तरुणांसमोर समस्यांचा ढीग पडला आहे.समस्यांतून आपली कशी सुटका करावी, असाच प्रश्‍न जो तो तरुण स्वत:ला विचारत असतो. त्यामुळे तरुणाईची दशा अत्यंत बेकार आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात युवक पाश्‍चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करत आहेत आणि त्या ‘ऋरीीं ङळषश‘ च्या ‘ढीशपव‘ खाली आपण प्रेम, त्याग, धीर, ध्यास हे गुणधर्म विसरत चाललो आहोत.
आजचा युवक हा उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार आहे. आपलं पुढचं भविष्य तर आपणच रंगवणार आहोत. आपली संस्कृती आजच्या निसर्गाची पूजा करते आणि आजचा युवक गुटखा, तंबाखू हीच त्यांची देवता आणि त्यांचे सेवन हीच आजच्या युवकाची पूजा... असं चित्र आहे. आजचा युवक हा भलत्याच गोष्टींच्या मागं लागला आहे. गुंतला आहे. खरं तर एक काळ असा होता की, भारत ही सुवर्णभूमी होती. ज्ञान आणि अध्यात्म यामध्ये तो अग्रेसर होता.  अनेक परदेशी लोक ज्ञान ग्रहणासाठी येत होते आणि येथील पंडित त्यांना ज्ञानदानाचे कार्य करत, अशी महान परंपरा भारताला लाभली. भारताला स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर यासारखे आदर्श गुरु लाभले. भारताचा इतिहास उज्ज्वल आहे.निरनिराळे धर्म, तर्‍हेतर्‍हेचे लोक, वेगवेगळे पोषाख, विविध भाषा या विविधतेतून एकता आपण साधली...मग आजचा युवक एवढा निरुत्साही का? केवळ स्वत:चा धर्म श्रेष्ठ व दुसर्‍यांची धर्मतत्व निषिद्ध मानणारा युवक एकमेकांना धर्माविरुद्ध आंदोलनं, दंगली का करता? कुणी शिकवलं श्रेष्ठ-कनिष्ठ? हे आपल्या संस्कृतीत नाही. “ हे विश्‍वची माझे घर’’ असं मानणार्‍या संस्कृतीचा संदेश गेला कुठं? एवढा स्वार्थी, मतलबी युवक भारतात होतो आणि म्हणूनच आजच्या युवकांनी खडबडून जागे झालं पाहिजे. शेवटी एवढंच म्हणेन-
“उठ तरुणा जागा हो, गरज आहे काळाची’’
संस्काराने फुलवून टाक तू फुलबाग या मनाची...’’
कोमल पाटील
मो. 8975846674