Breaking News

सत्ता असो, नसो विकासकामे करणार खासदार डॉ. विखे यांचे प्रतिपादन

   
पारनेर/प्रतिनिधी ः
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदस्य पुष्पा वराळ यांनी चार वर्षांत मोठी विकासकामे केली आहेत. सत्ता असो वा नसो कामे करीत राहाणे हीच आमची व आमच्या  कार्यकर्त्यांची प्रामाणिक भावना आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
तालुक्यातील गाडीलगाव ते गाडीलकर मळा या रस्त्याच्या डांबरीकरणास सोमवारी विखे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. 
अध्यक्षस्थानी पुष्पा वराळ होत्या.
      जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत चेडे, राहुल शिंदे, दिनेश बाबर, भाजप तालुकाध्यक्ष विश्‍वनाथ कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, संदीप पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ, संदीप सालके, सरपंच राधाबाई खोसे, उपसरपंच कचरु कारखिले, पारनेर तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेश गोपाळे, संपत सालके,  मंगेश सालके, मुंबई बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुनील पवार, ठेकेदार बाबाजी लंके, मळगंगा पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष बजरंग वराळ, मंगेश लाळगे, नीलेश घोडे, मंगेश वराळ,
माजी उपसरपंच सुभाष गाडीलकर, दत्ता गाडीलकर, राणी सराफ, अमोल सालके, पप्पू पठारे यावेळी उपस्थित होते. खासदार विखे म्हणाले, संदीप पाटील फाउंडेशनच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निघोज, अळकुटी जिल्हा परिषद गटात 25 कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. अशाप्रकारे कामे करीत राहा, अशी सूचना विखे यांनी केली.
पुष्पा वराळ म्हणाल्या, माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचा विकासकामांचा आदर्श घेत आपण कामे करीत आहोत. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या पाठबळाने मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. नीलेश घोडे यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब खोसे यांनी आभार मानले.