Breaking News

'समर्थ' प्रशालेचे घवघवीत यश


अहमदनगर / प्रतिनिधी
प्रवरानगरच्या महात्मा गांधी विद्यालयात पार पडलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला (उच्च माध्यमिक) सावेडी या शाळेतील दिव्या जयदीप कुलकर्णी आणि सानिका अजय घोरपडे या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले. वक्तृत्व स्पर्धेसाठी दिव्याचा विषय 'युवाशक्ती हीच खरी संपत्ती' हा होता तर सनिकाचा विषय 'सत्य,  अहिंसा आणि शांततेचे पूजक महात्मा गांधी' हा होता. समर्थ उच्च माध्यमिक शाळेला द्वितीय (सांघिक ) क्रमांकाचे बक्षीस मिळाले. यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव शालेय समिती चेअरमन विधिज्ञ किशोर देशपांडे, व्हाईस चेअरमन डी. आर. कुलकर्णी, सुरेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. या गौरव सोहळ्यास प्राजक्ता केसकर, नीलाक्षी केळकर, शिल्पा कुलकर्णी, कल्पना राजगुरू आणि सुमती कोळंबे, वर्षा पाठक, गीतांजली मुटकुळे या शिक्षिका उपस्थित होत्या.