Breaking News

चोरट्यांच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी वृद्धाच्या सतर्कतेने शेळ्या चोरीचा प्रयत्न फसला
जामखेड/प्रतिनिधी
 तालुक्यातील खर्डा परिसरातील वाकी रोडवरील शिंदे वस्ती येथे शेडमधल्या शेळ्या चोरी करत असताना भगवान विश्वनाथ शिंदे (वय ६५) यांच्यावर चोरटय़ांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरी, मारहाण प्रकरणी अज्ञात चोरटय़ाविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  दि १४ रोजी पहाटे २.३० वाजे दरम्यान शेतावर असलेल्या शेळ्यांच्या शेड मध्ये फिर्यादी भगवान विश्वनाथ शिंदे हे झोपलेले होते. शेळ्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांना जाग आली. तेव्हा दोन अनोळखी चोरटे शेळ्या चोरून घेऊन जाताना दिसले. फिर्यादीने चोरट्यांचा तावडीतून आरडाओरडा करत शेळ्या सोडवल्या. याचा राग येऊन चोरट्याने दगडाने केलेल्या मारहाणीत फिर्यादी भगवान शिंदे यांच्या उजव्या डोळ्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले.
 आरडाओरडा होताच चोरटे घटनास्थळावरून पळून गेले. त्यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. जखमी भगवान शिंदे यांच्यावर खर्डा येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपविभागीय अधिकारी सातव यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पो. काँ. नवनाथ भिताडे करत आहेत.