Breaking News

सर्वांच्या सहकार्यातून दर्जेदार कामे:गडाखनेवासे/प्रतिनिधी
 नेवासे शहरातील कायापालट करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. दर्जेदार कामे होण्यासाठी नागरिकांनी देखील सूचना कराव्यात. त्यासाठी याकामी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन सुनीता गडाख यांनी केले. नेवासे शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये सुमारे २२ लाख रुपये खर्चाच्या भूमिगत गटार कामांचा  सुनीता गडाख यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
 डॉ.हेडगेवार चौक येथून सुरू होणाऱ्या भुयार गटाच्या उदघाटन प्रसंगी नगराध्यक्षा योगिता पिंपळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सतीश पिंपळे, अर्चना कुंभकर्ण, प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक संदीप बेहळे, नगरसेवक फारूक भाई आतार, बापूसाहेब गायके, अंबादास ईरले,जेष्ठ व्यापारी व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गफूरभाई बागवान, सुधाकर डहाळे, जयप्रकाश रासने, निलेश जगताप, विनायक नळकांडे, भाऊसाहेब वाघ, नारायण लोखंडे, कैलास कुंभकर्ण आदी उपस्थित होते. यावेळी श्रीकृष्ण तरुण मंडळाचे कार्यकर्ते रामनाथ गरुटे, आनंद प-हे, कमलेश सरगैये, अक्षय गव्हाणे, आकाश गव्हाणे, ऋषी साठे, मनोज बिस्वास यांच्या वतीने तिळगुळ कार्यक्रम राबविण्यात येऊन सुनीता गडाख यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
 यावेळी झालेल्या प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक संदीप बेहळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.प्रभाग क्रमांक ११ अंतर्गत सुरू होणाऱ्या भूमिगत गटारींची कामे ही सुमारे २२ लाख रुपये खर्चाची असून ती एकहजार पन्नास मीटर लांबीची असून यामध्ये डॉ.हेडगेवार चौक ते श्री मोहिनीराजांचे मंदिर, बाजारतळ गरुटे गल्ली, कडू गल्ली परिसर, दुर्गादेवी मंदिर परिसर, मुख्य पेठेतील काही भागांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.