Breaking News

पुलावर पडलेला 'तो' पडलेला प्रशासनाने बुजविला 'लोकमंथन'च्या वृत्ताची दखल


भिंगार / प्रतिनिधी
पंपिंग स्टेशन रस्त्यावरील पूल धोकादायक अशा आशयाची बातमी 'दैनिक लोकमंथन'मध्ये प्रसिद्ध होताच याची दखल प्रशासनाने घेतली. या भागातील  पुलावर पडलेला धोकादायक खड्डा बुजवण्यात आला. मात्र येथील संरक्षक कठडा केव्हा बांधला जाणार, याची स्थानिक रहिवाश्याना प्रतीक्षा आहे.
दरम्यान, धोकादायक पुलावरील पडलेला खड्डा बुजवण्यात आल्याबद्दल स्थानिक नागरिक व परिसरातील नागरिकांनी 'दैनिक लोकमंथन'ला धन्यवाद दिले. भिंगार शहरालगत असलेल्या नागरदेवळे गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. या भागातील कापूरवाडी, सावतानगर, पंपिंग स्टेशन आणि आलमगीरकडे जाण्याकरता शहरांमधून जाणारया रस्त्याला या 'पंपिंग स्टेशन रस्ता' अशा नावाने संबोधतात. त्या रस्त्यावरील सावतानगर मारुती मंदिराच्या अलीकडे धबधबीचा ओढा लागतो. या ओढ्यावरील पुलाला मोठे खड्डे पडले होते. पुलाला असणारा संरक्षक भिंतीचा कठडा पडलेल्या अवस्थेत नागरिकांना पुलावरून जाताना या भागातून ये-जा करताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. धोकादायक पडलेला खड्डा असल्यामुळे पुलावरून जातांना रात्री-अपरात्री गावांमध्ये नागरिकांमधील भीतीचे वातावरण झाले होते. मात्र सदर खड्डा बुजविण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.