Breaking News

लांडगे यांची ‘खेलो इंडिया’करिता निवडअहमदनगर/प्रतिनिधी :  येथील स्वकुळ
साळी हितसंवर्धक मंडळाचे विश्‍वस्त जितेंद्र लांडगे यांचा मुलगा गणेश याने कानपूर येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत रौप्यपदक मिळविलेले आहे. गणेश हा पुणे येथील डॉ. चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रथम वर्ष बी.पी.एड. चे शिक्षण घेत आहे.
गणेश याची ओरिसा येथे होणार्‍या ‘खेलो इंडिया’ या स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. त्याबद्दल त्याचा उमेश कोदे, कृष्णा बागडे यांनी सत्कार केला. तसेच ‘नगर दक्षिण’चे खासदार डॉ. सुजय विखे पा., नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव, विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक  त्रिंबक घुगरकर यांनी अभिनंदन केले. गणेशला यंग मेन्स ज्युदो हॉलचे धनंजय धोपावकर, विजय धोपावकर व प्रा. संजय धोपावकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.