Breaking News

भिंगारला चौंडेश्वरी देवी जन्मोत्सव उत्साहात


भिंगार / प्रतिनिधी
भिंगार येथे चौण्डेश्वरी देवी जन्मोत्सव सोहळा आणि शाकंभरी पौर्णिमेनिमित्त देवांग कोष्टी समाजाच्यावतीने शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत  देवांग कोष्टी समाजाचे बांधव महिलांसह युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शोभायात्रेचे भिंगार राष्ट्रवादीच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी मिरवणुकीतील पालखी चौण्डेश्वरी मातेच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र पाटील, कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, विलास निरवणे, राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, अर्जुन बेरड, दिपक लिपाने, रमेश वराडे, तुषार घाडगे, सदाशिव मांढरे, देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष संदिप टेके, उपाध्यक्ष शिवम भंडारी, सचिव अनिल सोळसे, ज्ञानेश्वर फासे, पिंटू खरपे, माऊली दिघे, गजानन भंडारे आदींसह देवांग कोष्टी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवांग स्वामींच्या वेशभूषेतील युवक, महिला भजनी मंडळी, चौण्डेश्वरी मातेची मूर्ती आणि महिलांनी साकारलेला रिंगण सोहळा या मिरवणुकीचे आकर्षण ठरले.