Breaking News

बस - डंपरचा भीषण अपघात लागलेल्या आगीमध्ये एकाच मृत्यू आठ जखमी नेवासे/प्रतिनिधी
 नगर औरंगाबाद महामार्गावर असलेल्या प्रवरासंगम येथील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या कमानीसमोर डंपर लक्झरी बसच्या झालेल्या अपघातात डंपरने पेट घेतला. त्यात एकाचा होरपळून मृत्यू झाला तर लक्झरी बसमधील आठ जखमी झाले. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.
 याबाबत मिळालेली माहिती अशी, लक्झरी बस (क्रमांक जी.जे.१४ झेड ८५८५) ही नगरवरून औरंगाबादकडे चालली असताना गोधेगाव सिद्धेश्वर मंदिर रोडवरून येणाऱ्या विना नंबरच्या डंपरची बसला जोराची टक्कर बसली. या टकरीत डंपरने पेट घेतला. यामध्ये डंपरमध्ये बसलेला मजूर पांडुरंग रामकीसन गायकवाड (वय २७, रा.प्रवरासंगम) याचा होरपळून मृत्यू झाला. डंपर मधील चालक अशोक शिंदे तर लक्झरी बसमधील चालक मोहन थावरा राठोडसह आठ प्रवासी जखमी झाले. या अपघातात डंपर जळून खाक झाला. तर लक्झरी बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला.
    अपघाताची खबर मिळताच नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भारत दाते, पोलिस नाईक बबन तमनर पोलिस कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात हलविले. यावेळी वाहतूक मोठ्या प्रमाणात कोंडली होती.