Breaking News

दूध धंदा वाढविण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करा महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांची मागणी


मुंबई ः सरकारने दूध ग्राहकांसाठी दरवाढ केली आहे. शेतकर्‍यांना प्रतिलिटर 30 रुपये भाव मिळत आहे. तर, ग्राहकांना दुप्पट दराने 60 रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. सध्याच्या स्थितीमध्ये 40 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावला जात आहे. मात्र, शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडत नाही. वाढती शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने तातडीने दूध धंदा वाढवण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना करावी, अशी मागणी महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी केली आहे.
महाराष्ट्र शेजारील कर्नाटक राज्य दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देते. मात्र, कधीकाळी दूध धंद्यात नंबर एकवर असलेला महाराष्ट्र आता तिसर्‍या क्रमांकावर गेला आहे आणि एका पैशाचेही अनुदान शेतकर्‍याला मिळत नाही ही शोकांतिका असल्याचे मत दूध कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी व्यक्त केले आहे. दूध भुकटी व बटरच्या दरात तेजी मात्र, दुधाचे खरेदीदर न वाढविता शेतकर्‍यांची लूटराज्यात दूध भुकटी व बटरच्या दरात तेजी असूनही दुधाचे खरेदीदर न वाढविता शेतकर्‍यांची लूट चालू असल्याची टीका दूध उत्पादकांनी केली आहे. मात्र, भुकटीच्या दरातील तेजीमुळे सध्या फक्त आमचा तोटा थांबला अजून दरवाढीत योग्य नफा झालेला नाही, असा दावा महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने केलेला आहे. दूध भुकटीचे दर प्रतिकिलो 120 रुपयांपर्यंत घसरताच दूध उत्पादकांचे खरेदीदर प्रतिलिटर 18 रुपयांपर्यंत कमी करण्यात आले होते. दर कमी करणार्‍या खासगी डेअरीचालक व सहकारी संघांना शेतकर्‍यांनीही पाठिंबा दिला होता. सरकारच्या दुर्लक्षामुळे ग्राहक आणि शेतकर्‍यांची लूटकल्याणकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी सरकारच्या दुर्लक्षामुळे ग्राहक आणि शेतकर्‍यांची पद्धतशीर लूट सुरू असल्याची खंत व्यक्त केली आहे.