Breaking News

गायी-म्हशीच्या दुधात आजपासून दोन रुपयांनी वाढ


मुंबई : गायी, म्हशींच्या दुधाच्या किंमतीत रविवारपासून वाढ होणार आहे. ऐन महागाईमध्ये दुधाच्या किंमतीत वाढ होणार असल्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. कल्याणकारी दूध संघाने गायी-म्हशींच्या दुधाच्या किंमतीत प्रति लीटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता गायीच्या दुधाची किंमत प्रति लिटर 48 रुपये झाली आहे. तर म्हशीच्या दुधाची किंमत 58 रुपये प्रति लिटर झली आहे. कल्याणकारी दूध संघाची दुधाच्या किंमतीबाबत शुक्रवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये दुधाचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य कल्याणकारी दूध संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी सांगितले की, हिवाळ्यात दुधाच्या 20 ते 22 टक्क्यांनी उत्पन्नात वाढ होते. मात्र यावर्षी उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे शेतीसोबतच दूध उत्पादनावर देखील परिणाम झाला. त्यामुळे 10 टक्के दूध उत्पादन घटले. दूध संघ अडचणीत आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.