Breaking News

नवनीत बार्शीकरांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून व्हीजन २०५०आराखडा


अहमदनगर / प्रतिनिधी
शहराचे शिल्पकार माजी आमदार-नगराध्यक्ष स्व. नवनीतभाई बार्शीकर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून नगर विकासाच्या विशेष संकल्प सभेचे आयोजन येत्या सोमवारी दि. १३ सायंकाळी सहा वाजता शहर सहकारी बँकेच्या (नवीपेठ) मुकुंद घैसास सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. नवनीतभाईंप्रती आस्था आणि नगर विकासाच्या प्रश्नात काम करण्याची आवड असणार्या सर्वांनी या अभिवादन सभेत उपस्थित रहावे, असे आवाहन नवनीत विचार मंचचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी केले आहे.
ते म्हणाले, शताब्दीनिमित्त सर्वांगीण नगरविकासाचा व्हीजन २०५० आराखडा तयार करण्यात येऊन नगर विकासाची कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी पालकमंत्री दिलीप वळसे, कॅबिनेटमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना साकडे घालण्यात येणार आहे. तज्ञांच्या सहकार्याने नगर विकासाचा आराखडा करुन सर्व मंत्री तसेच . संग्राम जगताप, माजी मंत्री अनिल राठोड, महापौर, लोकप्रतिनिधी, मनपा प्रशासन यांचेकडे नियोजनबद्ध पाठपुरावा करण्यात येईल. नगरचे रखडलेले प्रश् विकास योजना, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय क्षेत्र आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून खा. पवार यांनी सविस्तरपणे ऐकून घेतले. अतिशय समाधानकारक चर्चा केली आणि निवडणुकीनंतर नगरसाठी स्वतंत्र वेळ देण्याचे त्यांनी मान्य केले होते. सुदैवाने नगरच्या प्रश्नांची जाण आणि आस्था असलेले महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी पालकमंत्री वळसे, गडाख आणि तनपुरे आता राज्याच्या मंत्री मंडळात आहेत. काहीतरी वेगळं घडण्याच्या जिद्दीने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली आहे. त्यामुळे नगरला निश्चितच काहीतरी मिळेल, अशी आशा आहे.