Breaking News

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा ९ लाखांचा मुद्देमाल जप्त कोळगाव/प्रतिनिधी
 श्रीगोंदे तालुक्यातील हिंगणी गावच्या शिवारातील नदीच्या पात्रात अनाधिकृतपणे, विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर बेलवंडी पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकला. या कारवाईमध्ये सुमारे लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाळू वाहतूक करणारे ट्रक चालक-मालक यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
 याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवार दि. १४ रोजी रात्री उशिरा अहमदनगर पोलिस बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद माने यांना गुप्त बातमीदाराकडून श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी गावच्या नदीच्या पात्रात काही इसम अवैध वाळू उपसा करून ट्रकच्या सहाय्याने वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पो.नि.अरविंद माने, बेलवंडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी अहमदगर पोलिस यांनी हे नदी पात्रात जाऊन वाळू वाहतूक होत असल्याची खात्री करून घेतली. त्यानुसार सापळा रचून वाळू वाहतूक करत असलेली लाख रुपये किमतीची ट्रक क्रमांक एम.एच.१६... ६२९१ त्यातील ३० हजार रुपये किमतीची वाळू ताब्यात घेतली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ट्रक ड्रायव्हर फरार झाला असून याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल रोहित मिसाळ याच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपधिक्षक, कर्जत संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरविंद माने, .फौ.गवळी, पो..मधुकर सुरवसे, संभाजी शिंदे, पो.ना. झावरे, पो. हे. कॉ. विजयकुमार वेठेकर, पो.कॉ. देशमुख, पो. कॉ.ज्ञानेश्वर पठारे, पो. काँ. बारवकर यांनी केली.
  बेलवंडी पोलिसांनी सध्या वाळू उपसा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सुरु केलेल्या कारवाईने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. मात्र पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या हंगा नदीतून राजरोस अवैध वाळू उपसा सुरु असून त्या कडे बेलवंडी पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असल्याने पोलिसांबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु असल्याचे दिसून येत आहे.