Breaking News

बोल्हेगाव उपनगरात टोळक्यांकडून दहशत

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील गांधीनगर, बोल्हेगाव या उपनगरातील परिसरात गेल्या काही दिवसांपासून टोळक्यांकडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांचा बंदोबस्त करुन पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी नगरसेवक कुमार वाकळे यांच्यासह नागरिकांनी तोफखाना पोलिसांकडे केली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्ह
टले आहे की, गांधीनगर, बोल्हेगाव या भागामध्ये गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांचा वावर वाढला असून गाड्यांच्या काचा फोडणे, महिला व युवतींची छेडछाड करणे, रात्रीच्या वेळी टोळक्याने दुचाकी गाड्यांवर फिरुन आरडाओरडा करणे, रात्रीच्या वेळी एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये घरी जाणार्‍या कामगारांना अडवून मारहाण करणे, त्यांना लुटणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे या भागात रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.
याबाबत नगरसेवक वाकळे यांच्या नेतृत्वाखाली सुनील भालेराव, मोहन गाडे, अरविंद आरखडे, सदानंद डहाळे, गणेश शिंदे, विशाल पाटील, अजय कुशवाह, किरण मेटे, नितीन उजागरे, सुरेश शिंदे, बाबासाहेब शिकारे, विकास गाडे, इनामुलहसन अन्सारी, शुभम कळसकर, अमोल वाघमारे आदिंनी तोफखाना पोलिस ठाण्याचे पो.नि. हरुण मुलानी तसेच उपनिरीक्षक के.बी.धायवट यांना निवेदन दिले.