Breaking News

तहसीलदारांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न देसवडे येथील घटना;चालक फरारपारनेर/प्रतिनिधी
 पारनेर तालुक्यातील देसवडे येथे तहसीलदार ज्योती देवरे आपल्या पथकासह वाळूचोरी विरोधात कारवाई करत असताना डंपर चालकाने त्यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो डंपर चालक पसार झाला. या कारवाईत तीन डंपर सह एक जेसीबी ताब्यात घेतला असून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
 तालुक्यात बेसुमार अवैधरित्या वाळू उपसा वाहतूक सुरू असल्याने वेळोवेळी तहसीलच्या पथकाने कारवाई केली आहे. मात्र या वाळू तस्करीला लगाम बसताना दिसत नाही. आज (शुक्रवार) तहसीलदार ज्योती देवरे यांनी देसवडे येथे सकाळी ११ वाजेच्या सुमारास महसूल पथकासह छापा टाकला. यावेळी  चार डंपर एक जेसीबी त्या ठिकाणी आढळून आले. एका डंपर चालकाने डंपर पळून नेण्याच्या प्रयत्नात तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत त्या बाजूला झाल्या. उर्वरित दोन डंपरमध्ये 8 ब्रास वाळू होती. या सर्वाचा पंचनामा करून जेसीबी साठी 7 लाख 50 हजार तर डंपरसाठी लाख असे एकूण पंधरा लाख पन्नास हजार रुपयांचा दंड करण्यात आला. ताब्यात घेतलेली वाहने पारनेर तहसील कार्यालयामध्ये आणण्यात आली असून पळून जाणाऱ्या वाहनचालकाचा वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे देवरे यांनी सांगितले. या पथकात मंडळ अधिकारी सचिन पोटे. दीपक कदम, अमोल मंडलिक, कॉन्स्टेबल मोरे शिंदे यांचा समावेश होता.
 वाळू तस्कर हे अधिकाऱ्यांचे लोकेशन ठेवत असल्याने अनेक वेळा कारवाया फसतात. मात्र यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी आपले सरकारी वाहन वापरता खासगी वाहनामधून (पीक-अप) जात  कारवाई केली