Breaking News

शासन खंबीरपणे शेतकर्‍यांच्या पाठिशी : कृषिमंत्री ना.भुसे

अहमदनगर/प्रतिनिधी : “शासनाच्या वतीने शेतकर्‍याची कर्जमुक्तीकडे वाटचाल सुरु असून, नुकत्याच जाहीर झालेल्या दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीमुळे राज्यातील शेतकर्‍यांना मोठा आधार मिळाला आहे, भविष्यातही शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी हे शासन काम करणार आहे. शेतमालाला भाव, शेतीमालावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येणार असून, जेणेकरुन शेतकर्‍यांना त्याचा फायदा होईल. हे शासन शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील, असे आश्‍वासन राज्याचे कृषिमंत्री ना.दादा भुसे यांनी केले.
कृषिमंत्री ना.भुसे नगर येथे आले असता त्यांचा नगर तालुका शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले व तालुकाप्रमुख राजेंद्र भगत यांनी सत्कार केला. यावेळी जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, जि.प.सदस्य शरद झोडगे, पं.स.माजी सभापती रामदास भोर, प्रवीण कोकाटे, रफीक शेख आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी ना.भुसे यांना देऊन चर्चा करण्यात आली.