Breaking News

भाजपा तालुकाध्यक्षपदी ताराचंद लोढे


शेवगाव / प्रतिनिधी
तालुक्यातील दहिगाव ने गटातील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते ताराचंद लोढे यांची शेवगाव भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली.
शहरटाकळी, भावीनिमगाव, दहिगावने, मठाचीवाडी, ढोरसडे, अंत्रे सह परिसरात भाजपाचे अनेक वर्षांपासून ते एकनिष्ठपणे काम करत आहेत. सर्वांशी सलोख्याचे संबध त्यांनी प्रस्थापित केले असल्याने त्यांची निवड होताच दहिगाव ने गटातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांकडूनही लोढे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यामुळे दहिगाव ने गटात भाजपा संघटन वाढण्यासाठी मदत होणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दहिगाव ने गटात आता भाजपा तालुकाध्यक्ष निवडला गेल्याने येत्या काळात छुप्या राजकारणाने येथील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची डोकेदुखी वाढणार आहे. लोढे यांचे गटातील भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस वाय. डी. कोल्हे, माजी सरपंच गुरुनाथ माळवदे, सोसायटी माजी अध्यक्ष  संतोष शेटे, सेवा सोसायटी संचालक  राजेंद्र बरबडे,  बाळासाहेब ठोंबळ, बसिरभाई पठाण, ग्रामपंचायत सदस्य सुनील गवळी, राजेंद्र खंडागळे, लक्ष्मणराव मुुुंगसे, प्रशांत वेलदे, श्रीधर खरड, अशोक निंबाळकर सह कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
'ते' शरीरानेच राष्ट्रवादीत
राष्ट्रवादीचे स्वयंघोषित पुढारी स्वतःचा नावलौकिक वाढावा प्रसिद्धी झोतात यावे, यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. नेतृत्वही त्यांच्या अशा गोष्टींचे समर्थन करताना दिसते. त्यामुळे या परिसरातील राष्ट्रवादीचे निष्ठावान तरुण कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. असे कार्यकर्ते शरीराने जरी राष्ट्रवादीत असले तरी मनाने मात्र फारच दुरावले असल्याचे चित्र आहे.