Breaking News

राज ठाकरेंच्या धरसोड वृत्तीमुळे समर्थक गोंधळात

लोकसभा आणि विधानसभा 2019च्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी जोरदार निवडणूक प्रचार केला. लोकसभा निवडणुकीत तर स्वत:चे उमेदवार नसतानाही मोदी-शहा यांच्या विरोधात मैदानात उतरले असल्याचे चित्र दिसून आले आणि विधानसभेला त्यांच्या पक्षाने काही जागा लढवल्या. त्यांच्या सभांना होणारी गर्दी आणि मिळणारा प्रतिसाद विलक्षण असला तरी त्या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होऊ शकले नाही. या दोन्ही निवडणुकांच्या आधी राज हे शरद पवार यांच्या जवळ होते. नंतर मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. त्यात शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. उद्धव यांना मुख्यमंत्री बनवताना पवार यांच्या मनात ठाकरे परिवाराशी असलेला जिव्हाळा असेल. परंतु प्रत्यक्ष ठाकरे परिवारात हा जिव्हाळा उरलेला नाही, याचेच प्रत्यंतर राज यांच्या नव्या भूमिकेतून येते. आपल्या पक्षाची भूमिका नेमकी उलटी घेण्यातून त्यांच्यातील वैफल्याचे दर्शन घडते. म्हणूनच मग शिवसेनेला शह देण्यासाठी आक्रमक हिंदुत्ववादाची भूमिका घेऊन त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.या देशात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाचा विचार रुजवला. हिंदुत्वाचा विचार देशाला अभिप्रेतच होता, आता काही लोकांना पालवी फुटली आहे. फुटू द्या. अशी टिका शिवसेनेकडून करण्यात आली असली ती राज ठाकरे यांच्या अशा धरसोड वृत्तीमुळे मार्केटिंग करणार्‍याचीच विश्‍वासार्हता लयाला जाऊ शकते आणि आता राज ठाकरे त्या टप्प्यावरच पोहोचलेआहेत.

लोकसभा आणि विधानसभा 2019च्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी जोरदार निवडणूक प्रचार केला. लोकसभा निवडणुकीत तर स्वत:चे उमेदवार नसतानाही मोदी-शहा यांच्या विरोधात मैदानात उतरले असल्याचे चित्र दिसून आले आणि विधानसभेला त्यांच्या पक्षाने काही जागा लढवल्या. त्यांच्या सभांना होणारी गर्दी आणि मिळणारा प्रतिसाद विलक्षण असला तरी त्या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होऊ शकले नाही. या दोन्ही निवडणुकांच्या आधी राज हे शरद पवार यांच्या जवळ होते. नंतर मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. त्यात शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राज ठाकरे यांनी पुण्यात शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा ’रॅपिड फायर’ प्रश्‍नांमध्ये ’उद्धव की राज?’ असा प्रश्‍न विचारला गेला होता. तेव्हा पवार यांनी चाणाक्षपणे ’ठाकरे परिवार’ असे उत्तर दिले. उद्धव यांना मुख्यमंत्री बनवताना पवार यांच्या मनात ठाकरे परिवाराशी असलेला असलेला हाच जिव्हाळा असेल. परंतु प्रत्यक्ष ठाकरे परिवारात हा जिव्हाळा उरलेला नाही, याचेच प्रत्यंतर राज यांच्या नव्या भूमिकेतून येते. आपल्या पक्षाची भूमिका ठरवण्याचा त्यांना अधिकार असला तरी काही आठवड्यांपूर्वी आपण जी भूमिका घेतली होती, त्याच्या नेमकी उलटी भूमिका घेण्यातून त्यांच्यातील वैफल्याचे दर्शन घडते. म्हणूनच मग शिवसेनेला शह देण्यासाठी आक्रमक हिंदुत्ववादाची भूमिका घेऊन त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. या अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. पहिल्यांदाच सावरकर यांची प्रतिमा मनसेच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे मनसे हिंदुत्ववादी भूमिका घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
राज ठाकरे हे इतकी वर्षे राजकारणात आहेत. त्यांच्या कानांना आताच मशिदीवरच्या भोंग्यांचा त्रास व्हायला लागला का,’ असा प्रतिसवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केला आहे.मुंबईत झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला. त्यावेळी त्यांनी घुसखोरांसह मशिदीवरील भोंग्यांबद्दलही भाष्य केलं होतं. ’धर्म प्रत्येकानं घरात ठेवायला हवा. मशिदीवरचे भोंगे बंद झाले पाहिजेत. आमची आरती कोणाला त्रास देत नाही. पण नमाजाचा त्रास होतो. नमाज पठण करण्यास आमची हरकत नाही. पण भोंगे लावून कशाला?,’ असं राज म्हणाले होते.राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा जलील यांनी समाचार घेतला. ’शिवसेना आता धर्मनिरपेक्ष झाली आहे. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळं आता हिंदुत्वाचा मुद्दा कोण हाती घेणार, असा प्रश्‍न होता. तो मनसेनं घेतला आहे. हे केवळ राजकारण आहे. त्यांना हे आधी का आठवले नाही,’ असं जलील म्हणाले. तसेच मनसेच्या सभेला गर्दी होते, पण त्यांना मते मिळत नाही. आता त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला आहे. त्याने काहीही फरक पडणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असं आठवले म्हणाले. भाजपने मनसेबरोबर युती न करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
 राज यांच्या चौदा वर्षांच्या स्वतंत्र वाटचालीनंतरही ते चाचपडताना दिसतात. त्यांच्या काही वर्षे आधी स्थापन झालेला ’तेलंगण राष्ट्र समिती’ आणि नंतर स्थापन झालेला ’वायएसआर काँग्रेस’ असे पक्ष आपापल्या राज्यात स्वबळावर सत्तेत आले. याउलट राज ठाकरे यांची सर्वोत्तम कामगिरी ठरते ती दहा वर्षांपूर्वीची तेरा जागांची आणि त्यानंतरच्या दोन निवडणुकांमध्ये फक्त एकेक आमदार. प्रसार माध्यमांच्या भरवशावर राजकारण करताना राज ठाकरे यांनी लोकांशी संपर्क ठेवला नाही. थेट लोकांमध्ये मिसळण्याबरोबरच संघटनात्मक बांधणीची गरज असताना ते वरवरची मलमपट्टी करून सतत चर्चेत राहिले. स्वत:च्या पक्षाच्या हिताचे राजकारण करण्याऐवजी अन्य कुठल्यातरी पक्षाच्या फायद्या-तोट्याचा विचार करून त्यांनी राजकारण केले. त्यामुळे इतरांच्या इशार्‍यांवरुन राजकारण करणारा पक्ष अशी मनसेची प्रतिमा बनली. त्यांनी आताच्या अधिवेशनात व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमा ठेवल्या होत्या.
एखाद्या आदर्शवादी भाबड्या तरुणाने आपल्या खोलीत गांधींपासून भगतसिंहांपर्यंत आणि लालबहादूर शास्त्री यांच्यापासून साने गुरुजी यांच्यापर्यंत अनेक महापुरुषांच्या तसबिरी टांगाव्यात, तेवढाच भाबडेपणा राज यांच्या या कृतीमधून दिसून येतो. राजकारण म्हणजे मार्केटिंगचे क्षेत्र असल्यासारखा त्यांचा सारा व्यवहार आहे. कालपर्यंत जे विकत होतो ते खपत नव्हते म्हणून आज नवीन माल घेऊन आल्यासारखे. मार्केटिंगचे कौशल्य असले तरी जे उत्पादन विकायचे आहे त्याचीही विश्‍वासार्हता असावी लागते किंवा ती निर्माण करावी लागते. एखादे उत्पादन खपत नाही म्हणून लगेच ते सोडून दुसरे घ्यायचे नसते. जे खपवायचे आहे, ते नीट लोकांपर्यंत नेताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. राज ठाकरे यांच्या हे लक्षात येत नसेल असे नव्हे. परंतु अशा धरसोड वृत्तीमुळे मार्केटिंग करणार्‍याचीच विश्‍वासार्हता लयाला जाऊ शकते आणि आता राज ठाकरे त्या टप्प्यावर पोहोचत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाला हिंदुत्वाच्या वाटेवर नेऊन सोडताना आणि स्वत:चा गोंधळ उघड करताना समर्थकांनाही गोंधळात टाकले आहे. चौदा वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्याचे स्वप्न दाखवणारे राज ठाकरे आज मशिदीवरील भोंग्यांपाशी येऊन थांबले आहेत. यावरून त्यांच्या विकासाची कल्पना येते.