Breaking News

राज्यकर्त्यांनी जिजाऊंच्या धोरणाने काम करावे

अहमदनगर/प्रतिनिधी : “आजचे राज्यकर्ते शेतकर्‍याला कशाचीच मदत करत नाहीत तर त्याच्या जमिनी कार्पोरेट घराण्यांच्याच घशात घालण्यासाठी वेगवेगळे षडयंत्र राबविले जात आहे, अशी शेतकरी समूहाची भावना आहे. राज्यकर्त्यांनी जिजाऊंच्या धोरणानुसार काम केल्यास शेतकरी आत्महत्या नक्की थांबतील’’, असे प्रतिपादन जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष आरीफ सय्यद यांनी केले.
मखदूम सोसायटी, मुस्कान वेलफेअर असोसिएशन, रहेमत सुलतान फाउंडेशन, क्रांतीसिंह कामगार संघटना यांनी संयुक्तपणे जिजाऊ जयंतीचे नगर वस्तू संग्रहालयात आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी सय्यद बोलत होते. इंजि.अभिजीत वाघ आणि बाळासाहेब पवार यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास आबीद दुलेखान, बाळासाहेब पवार, शफाकत सय्यद, फिरोज शेख, यशवंत तोडमल, आरीफ सय्यद, नादीर खान, नईम सरदार, युवराज गुंड, तारीक शेख, ठाकूरदास परदेशी, बहिरनाथ वाकळे आदी उपस्थित होते.