Breaking News

तुकाराम मुुंढेनी स्वीकारला पदभार, कर्मचार्‍यांची तारांबळ

नागपूर : अत्यंत शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेले आयएएस अधिकारी तुराम मुंढे यांची नागपूर येथे बदली झाली आहे. आज सकाळी बरोबर साडेनऊच्या ठोक्याला मुंढे यांनी नागूपर आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. तसेच, पदभार सिवीकारताच पहिल्याच दिवशी त्यांनी महापा
लिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. मागिल काही दिवसांपासूनच नागपुरात तुकाराम मुंढे यांच्या कडक शिस्तीवरून विशेष चर्चा रंगत होत्या. राजकीय नेत्यांना न जुमानणारे व्यक्तीमत्त्व म्हणून अनेकजण धास्तावलेले असल्याचीही माहिती मिळत होती. आज तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारला. तुकाराम मुंढे हे कार्यालयात आल्यानंतर, त्यांच्या केबिनबाहेर जुन्या आयुक्तांच्या नावाची पाटी होती. ती पाटी बदलून तुकाराम मुंढेंच्या नावाची पाटी लावताना, कर्मचार्‍यांची एकच धावाधाव झाली. तुकाराम मुंढे केबिनमध्ये गेल्यानंतर, कर्मचार्‍यांनी कोणताही आवाज न करता, केबिनच्या दरवाजावरील पाटी बदलून, तुकाराम मुंढेंच्या नावाची पाटी लावली. राज्याचे एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून कारभार पाहणारे तुकाराम मुंढे यांची 21 जानेवारी रोजी नागपूरचे आयुक्त म्हणून बदली झाली. मात्र तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्याआधीच महापालिकेच्या कर्मचार्‍यांच्या मनात धास्ती निर्माण झाली. नागपूर मनपातील बरेचसे कर्मचारी 23 जानेवारीपासून चक्क वेळेवर मनपा कार्यालयात दाखल होत आहेत. विशेष म्हणजे एरव्ही बर्‍याचदा वेळेवर न येणारे अधिकारीही दहाच्या ठोक्याला मनपाच्या कार्यालयात दाखल होत आहेत. नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. महाविकासआघाडीचे नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी नागपूरचा गड असलेल्या पालिकेत तुकाराम मुंढेंची बदली केली आहे. मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. येत्या दोन वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर मुंढे यांची आयुक्तपदी बदली करण्यात आल्याचे बोललं जात आहे.