Breaking News

सोनटक्के यांचे पदाला न्याय देण्याचे काम प्रेरणादायी : उपायुक्त पठारे कर्मचारी पतसंस्थेने केला सोनटक्के यांचा सत्कार


अहमदनगर / प्रतिनिधी
मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून मनपा कर्मचार्यांचे आर्थिक प्रश्न मार्गी लागण्याचे काम होते. सहकारी संस्था या समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाचा घटक आहेत. या पतसंस्थेचे संचालक विलास सोनटक्के यांनी नगर मनपामध्ये शहर अभियंता पदाच्या माध्यमातून शहरातील विविध प्रश्न मार्गी लावले आहे. अडचणीच्या काळात या पदाला न्याय देण्याचे काम केले, असे प्रतिपादन उपायुक्त प्रदीप पठारे यांनी केले.
मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्यावतीने शहर अभियंता संचालक विलास सोनटक्के यांच्या स्वेच्छासेवानिवृत्तीबद्दल उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन बाबासाहेब मुदगल, व्हा. चेअरमन विकास गिते, इंजि. परिमल निकम, महादेव काकडे, आर. जी. सातपुते, सदाशिव रोहोकले, जितेंद्र सारसर, सतिश ताठे, श्रीधर देशपांडे, किशोर कानडे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब गंगेकर, कैलास भोसले, प्रकाश आजबे, नंदा भिंगारदिवे, चंद्रकला खलचे, अजय कांबळे, गणेश गाडळकर, सुकदेव गुंड, गोविंद दरेकर, अशोक जाधव, अंबादास साळी, आनंद तिवारी, राजू गंधे, विजय बालानी, सुनील चाफे, राकेश कोतकर, दिगंबर कोंडा, बाळासाहेब विधाते, अविनाश हंस आदी उपस्थित होते.
दरम्यान, सत्काराला उत्तर देताना सोनटक्के म्हणाले, मनपामध्ये सेवा करीत असताना सर्व अधिकारी कर्मचार्यांचे सहकार्य मिळाले. मनपा पतसंस्थेमध्ये संचालक पदावर तसेच चेअरमन पदावर काम करण्याची संधी मिळाली. या संधीच्या माध्यमातून सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्याचे काम केले. मनपा पतसंस्थेच्या ही सभासदांची कामधेनू आहे. सर्व सभासदांच्या अडी-अडचणींच्या काळात ती धावून येते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर देशपांडे यांनी केले. आभार प्रदर्शन विकास गिते यांनी केले.