Breaking News

आता पालकमंत्री पदावरुन नाराजी नाटय !


मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडख विस्ताराला झालेला विलंब, त्यानंतर खातेवाटपाला झालेल्या विलंबानंतर पालकमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अनेक मंत्र्यांनी आपली नाराजी उघड व्यक्त केली आहे. अहमदनगरचे काँग्रेसचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर, कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांच्याकडे अहमदनगरचे पालकमंत्री देण्यात आले आहे.
दुसरीकडे कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीचे मुश्रीफ आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यात चुरस होती. त्यामुळे दोघांच्या मारामारीत तिसर्‍याच म्हणजे थोरात यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्यात आले. तर सतेज पाटील यांना थेट भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या यादीत शिवसेनेकडे 13, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 12 आणि काँग्रेसकडे 11 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आले आहे. ज्या जिल्ह्यात ज्यांच्या जागा जास्त त्या पक्षाकडे पालकमंत्रीपद असे सुत्र ठरविण्यात आले आहे. त्यानुसारच एखाद्या जिल्ह्यात एका पक्षाचा वजनदार नेता असला तरी त्या जिल्ह्यात दुसर्‍या पक्षाचे आमदार जास्त असल्याने पालकमंत्रीपद दुसर्‍या पक्षाकडे गेले आहे. अहमदनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये असा प्रकार झाला आहे. त्यातून आता पालकमंत्री नाराजीनाट्य रंगू लागले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही असाच प्रकार समोर आला आहे़ औरंगाबादचे पालकमंत्रीपद शिवसेनेचे सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आले आहे.