Breaking News

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर साईचरणी लिन


 शिर्डी / प्रतिनिधी
 भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीने अवघा साईदरबार आज भारावून गेला. तेंडूलकर कुटुंबीयांनी साईदर्शन घेतले. यावेळी साईदरबारी सचिन . . सचिन  . . . जयघोष ऐकायला मिळाला.
 क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडूलकर यांनी सोमवारी पत्नी डॉ. अंजली, मुलगा अर्जुन व भाऊ अजित यांच्यासह साई दरबारी हजेरी लावली. यावेळी मंदिर परिसरात भाविकांनी सचिन यांच्या नावाचा जयघोष केला.  सचिन यांच्या हस्ते समाधीवर शाल अर्पण करण्यात आली. समाधीवरील सुवर्ण पादुकांवर अभिषेक करण्यात आला. दर्शनानंतर सचिन यांनी आज बाबांच्या दर्शनाने समाधान मिळाल्याची भावना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे व्यक्त केली. तत्पूर्वी संस्थानच्या वतीने तेंडुलकर कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.