Breaking News

महेश पतसंस्थेच्यावतीने रविवारी मधुमेह शिबीर


भिंगार / प्रतिनिधी
आजच्या धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे समाजाने अंगिकारलेल्या फास्टफूड आहार पद्धतीमुळे वाढणारे मधुमेहाचे प्रमाण पाहता समाजात मधुमेहाबद्दल जागरुकता यावी, यासाठी, भिंगारमधील महेश नागरी पतसंस्थेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून रविवारी दि. १२ सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत विनामूल्य भव्य मधुमेह निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महेश नागरी पतसंस्थेच्या भिंगार येथील मुख्य कार्यालयात हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. मधुमेहासाठी (डायबिटीस) रक्ताची विनामूल्य तपासणी करून  रुग्णांना जीवनपद्धतीविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. राहूल रमेश त्रिमुखे, (एम. डी. डी. एन.. बी.कार्डिओलॉजी), हृदय रोग तज्ञ यांच्या हस्ते होणार आहे. या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे संस्थेचे चेअरमन डॉक्टर अशोक चंगेडे, व्हाईस चेअरमन शांतीलाल मुनोत आणि संचालक मंडळ यांनी आवाहनं केले आहे.