Breaking News

महिला जिल्हाधिकार्‍याने लगावली भाजप नेत्याच्या कानशीलात


भोपाळ ः मध्य प्रदेशच्या राजगडमध्ये रविवारी नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने काढलेल्या तिरंगा यात्रेत भाजप कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यात चांगलाच वाद झाला. राजगडच्या जिल्हाधिकारी निधी निवेदिता यांनी या परिसरात जमावबंदीचा आदेश काढल्यानंतरही भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. कार्यकर्त्यांना समजावून सांगितल्यानंतर ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या निधी निवेदिता यांनी एका भाजप नेत्याच्या कानशीलात लगावली. यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला.