Breaking News

बदलत्या काळात माणसं एकत्र येतात : प्रा. साळवे


भिंगार / प्रतिनिधी
आज आपण सामाजिक समरसतेच्या माध्यमातून एकमेकांना स्विकारायला लागलो आहोत. ही वाट थोर महापुरुषांच्या कार्यातून निर्माण झाली आहे. त्यामुळे बदलत्या काळात माणसं दूर गेली तरी ती पुन्हा एकत्र आणता येतात, असे प्रतिपादन नाशिक येथील भोसले मिलिटरी स्कूलचे प्रा. संजय साळवे यांनी केले.  येथील स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनीतर्फे आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प साळवे यांनी गुंफले. 'महापुरुषांच्या कार्यातून सामाजिक समरसतेची वाटचाल' या विषयावर बोलत ते होते. प्रारंभी सुप्रसिद्ध गायक ओंकार देऊळगावकर यांनी देशभक्तीपर गीत गायले. प्रबोधिनी अध्यक्ष प्रमोद मुळे उपाध्यक्ष सुभाष त्रिमुखे यांनी स्वागत केले. संचालक रुपेश भंडारी यांनी व्याख्यात्यांचा सन्मान केला. संत एकनाथमहाराज, स्वामी विवेकानंद, न्यायमूर्ती रानडे, गोपालकृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षि विठ्ठल शिंदे, स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर, पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी केलेले सामाजिक समरसतेची कार्य व्याख्यात्यांनी स्त्रोत्यांसमोर मांडले.