Breaking News

फायनान्स कंपन्यांच्या आर्थिक लुटीविरुद्ध जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक अशोक सोनवणे यांचा पुढाकार!


अहमदनगर / प्रतिनिधी
फायनान्स कंपन्यांच्या आर्थिक लुटीविषयी दैनिक लोकमंथनने सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर तक्रारींचा पाऊस पडला. मात्र या तक्रादारांकडून कंपन्यांनी लेखी घेतले असल्याने त्यांना त्रास होऊ शकतो. याची भान ठेवत लोकमंथनचे मुख्य संपादक अशोक सोनवणे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे.
या निवेदनात सोनवणे यांनी  म्हटले आहे, की शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना वाहन खरेदीसाठी वित्त सहाय्य करणार्‍या एल. अ‍ॅड. टी, श्रीराम फायनन्स, हिरो, बजाज, इंडस इंड आदी वित्तसाह्य करणार्‍या कंपन्या विशेष प्रलोभन दाखवून कर्ज घेण्यास भाग पाडतात. कर्जदारदेखील यांच्या प्रत्येक गोड बोलण्यावर विश्‍वास ठेवून कंपन्यानी दिलेल्या द्वियअर्थी {डबल मिनिंग} शब्दांच्या करारनाम्यावर सह्या करून कर्ज देतात. कंपन्यांच्या या कागदपत्रांत अनेक अटी या अतिषय बारीक शब्दात छापून घेतलेल्या असतात. सर्व मजकूर इंग्रजी भाषेत असल्याने प्रत्येकाला इंग्रजी भाषेचे ज्ञान नसल्याने कर्जदाराने वाहनाच्या हप्त्याची अर्धी अधिक रक्कम ही भरलेली असते आणि पुढे दिलेले अनेक हप्ते भरलेले असतात. मात्र कर्जदाराचा एखादा हप्ता थकला किंवा एक-दोन दिवस विलंब झाला तर ६०० रुपये दंड आकारणी केली जाते. शिवाय एनओसी घेतांना पुन्हा कर्जदाराला २ हजार ५०० रुपये दंड आकरणी केली जाते. याशिवाय गाडी ओढून नेल्यास २ हजार रुपये अतिरिक्त दंड वसुल केला जातो. त्याशिवाय नियमित हप्ते असले तरी कंपनीच्या विविध एजन्सीमार्फत कर्जदाराला फोन करून मानसिक त्रास देतात. अतिरिक्त पैशांची मागणीसाठी या कंपन्या ग्राहकांचे फोन टॅब करत असून 'तुम्ही आमच्याकडे लेखी दिलेले आहे. याशिवाय चेक दिलेले आहेत, ते आम्ही बँकेत केव्हाही लावू, अशा धमक्या देतात. अहमदनगर जिल्ह्यातील या खाजगी सावकारी करणाऱ्या या कंपन्या गुंड पाळून त्यांच्यामार्फत कर्जदारांना धमक्या देत आहेत. या कंपन्यावर योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा जिल्हा पोलिस प्रशासनाच्या विरोधात आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत. याची पोलिस प्रशासनाने नोंद घ्यावी. दरम्यान, याविषयी कोणाला काही त्रास असल्यास मुख्य संपादक अशोक सोनवणे यांच्याशी {मो. नं. ९७६३०३२२७५ आणि ९८२२२५४४७५} संपर्क साधावा, असे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.  
चौकट
.. म्हणूनच कर्जदाराचे कौटुंबिक आयुष्य विस्कळीत 
अहमदनगर येथील विविध वित्तसंस्थाचे कर्मचारी कर्जदारांना सांगतात, की आमच्या कंपनीचे वरिष्ठ लोक पोलिसांच्या वरिष्ठांनादेखील हप्ता देतात. त्यामुळे आमचे कोणीही काहीही करू शकत नाही. तुम्ही तसे लिहून दिले आहे. अशा धमक्या देतात. मात्र या कंपन्यांचे हे अधिकारी ग्राहकांना याविषयी काहीही सांगत नाहीत. मात्र एकदा कर्जदाराच्या ताब्यात वाहन दिले आणि चार दोन हप्ते सुरु झाले, की हे अधिकारी त्यांचा खरा अवतार दाखवायला सुरुवात करतात. 'आम्हाला पोलीस प्रोटेक्शन असल्याने कायदा आमच्या बाजूने आहे. त्यामुळे आम्ही सांगू, ती रक्कम तुम्हाला भरावीच लागेल. अन्यथा तुमच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करावी लागेल', अशी धमकी दिल्याने ग्राहकांची चिंता वाढते आणि त्याचे कौटुंबिक आयुष्य विस्कळीत होते.