Breaking News

जय आनंद मंडळ आणि चेस क्लबतर्फे मोफत बुध्दीबळ मार्गदर्शन


अहमदनगर / प्रतिनिधी :
बुध्दीबळ खेळाला व खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळ आणि नव्याने सुरु झालेल्या चेस क्लबने मार्गदर्शन उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत दि.१८ व १९ जानेवारी रोजी दोन दिवसीय मोफत बुध्दीबळ मार्गदर्शन सेमीनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये आंतरराष्ट्रीय मानांकित बुध्दीबळ खेळाडू देवेंद्र वैद्य (१५०९ वे मानांकन) आणि चेतन कड हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांनी दिली. या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना चेस क्लबचे देवेंद्र वैद्य व मंडळाचे सेके्रटरी कुंतीलाल राका यांनी सांगितले, की यात बुध्दीबळाच्या डावाची सुरुवात, चाली, प्रतिचाली, डावाचा शेवट अशा अनेक गोष्टींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दोन दिवसीय हा प्रशिक्षण सेमिनार अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्यापाठिमागे अंबिका हॉटेल शेजारी होणार आहे. १५ वर्षांखालील मुलामुलींना यात सहभागी होता येईल.