Breaking News

जिल्ह्यात भाजपचे संघटन करणार व्यापक : मुंडे


 भिंगार/प्रतिनिधी
 भारतीय जनता पक्ष विचारधारा असलेला पक्ष असून जनसामान्यांच्या विश्वासामुळेच केंद्रात भाजप सत्तेत आहे. महाराष्ट्रात काही कारणांनी भाजप विरोधी पक्ष असला तरी राज्यातही सर्वात मोठा पक्ष भाजपच आहे. नगर जिल्ह्यात विधानसभेला पक्षाची पिछेहाट झाली असली तरी येत्या काळात भाजप पुन्हा अग्रस्थानी येईल. जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत व्यापक करण्याचा प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन भाजपचे नगर दक्षिणेचे नूतन जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केले.
 भाजपच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुंढे यांचा नगरमध्ये पक्षाचे मावळते जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ऍड.युवराज पोटे, मनोज कोकाटे, ऍड.विवेक नाईक, बापूसाहेब बाचकर, रोहन मांडे, शामराव पिंपळे, सचिन पारखी, नितीन उदमले आदी उपस्थित होते.
 अरुण मुंडे म्हणाले की, माजी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून आपल्याला जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, खा.डॉ.सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहचवून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्वांना सोबत घेवून पक्ष संघटनेचे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मावळते जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड म्हणाले की, पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी हरिभाऊ बागडे यांनी नगर जिल्ह्यातील तीनही जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यानुसार भैय्या गंधे, अरूण मुंढे राजेंद्र गोंदकर यांची निवड झाली असून हे तिघेही आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडून पक्षाला बळकटी आणण्याचे काम करतील, अशा शुभेच्छा बेरड यांनी दिल्या