Breaking News

महाविद्यालयांमध्ये आज ‘अवयवदान जनजागृती अभियान'


अहमदनगर / प्रतिनिधी
स्नेहालय आणि मृत्युंजय ऑर्गन डोनेशन फौंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगरमधील विविध महाविद्यालयांमध्येअवयवदान जनजागृती अभियानया कार्यक्रमाचे उद्या दि. १६ आयोजन करण्यात आले आहे. 'मृत्युंजय ऑर्गन फौंडेशनआणिफेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबईयांच्यातर्फे 'अवयवदान जनजागृती' पदयात्रेचे आयोजन केले आहे. नाशिक ते बेळगाव ६०० कि. मी. अंतराची अशी ही पदयात्रा आहे. दि. १६ ते १७ जानेवारी दरम्यान अहमदनगरमधील विविध विद्यालयांमध्ये आयोजित या जनजागृती  कार्याक्रमात जास्तीजास्त नगरकरांना सहभागी होऊन अवयवदानाचे महत्व जाणून घ्यावे, असे  आवाहन स्नेहालय परीवाराने केले आहे. अवयवदानाचा संदेश जास्तीजास्त  विद्यार्थी आणि तरुणांपर्यंत पोहचावा, त्याचे महत्व अधोरेखित व्हावे, या उद्देशाने ही पदयात्रा आयोजित केली असल्याचे, या पदयात्रेचे समन्वयक डॉ. भाऊसाहेब मोरे आणि सुनील देशपांडे यांनी सांगितले.