Breaking News

खळेवाडीतील दुर्गंधीयुक्त पाण्याचा विद्यार्थ्यांना त्रास


भिंगार / प्रतिनिधी
भिंगार शहरालगतच्या खळेवाडी भागात अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भिंगार हायस्कूल रयत शिक्षण संस्थेचे मायावती अॅबट हायस्कूल आहे. त्या दोनही शाळेत जाण्याकरता भिंगारमधील विद्यार्थी, विद्यार्थीनी आणि नागरिकांना एकमेव जवळचा रस्ता खळेवाडी भागातून शाळेत जाता येते. मात्र या खळेवाडी भागातील या रस्त्यालगतची पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्यावर दुर्गंधीयुक्त साचले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना त्या दुर्गंधीयुक्त पाण्यातून शाळेत ये जा करावी लागत आहे.
दरम्यान, यासंदर्भात संबंधित विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी तक्रार करूनही कॅंटोन्मेंट बोर्डाने त्याबाबत दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. रयत शाळेजवळ कचराकुंडीची मागणी प्रलंबित असताना अजूनही तिथे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कचराकुंडी तयार केलेली नाही. शाळेत जाण्याच्या मार्गावर  दुर्गंधीयुक्त पाणी आल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यातून मार्ग काढून ये जा करावी लागत आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना विविध आजारांना सामोरे  जावे लागत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने रयत हायस्कूलसमोर कचराकुंडी करावी आणि शाळेत जाणाऱ्या रस्त्यावर पाईपलाईन फुटल्यामुळे साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी. तसेच फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्याची  मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे.