Breaking News

विवेकानंद व जिजाऊंच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघात पुरस्कार वितरण

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व.किसनराव डोंगरे बहुद्देशीय सामाजिक संस्था आणि नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त सामाजिक कार्यात उत्कृष्ट काम करणार्‍या व्यक्तींना राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद समाज गौरव, ज्ञान गौरव, युवा गौरव व जिजाऊ समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
प्रारंभी क्रीडा अधिकारी नंदकुमार रासने यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी सोमनाथ जंगम देवा (केडगाव, नगर), चंद्रकांत बाहुबली (नगर), संभाजी गुठे (शिंगोरी, ता.शेवगाव), तुषार लाड (बारामती, जि.पुणे), अरविंद चन्ना (नगर) साहेबराव काते (नगर), सुनिल सकट (नगर), अशोक भालके (चांदा , ता.नेवासा), भैय्या बॉक्सर (नगर), अ‍ॅड.मनोज  कडू, साईप्रसाद कुंभकर्ण (कोल्हार भगवती, ता.राहता), आदर्श कर्मचारी संतोष कानडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच साहेबराव बोडखे, भागचंद जाधव, क्रीडा अधिकारी नंदकुमार रासने, बाळू पवार, अतुल फलके, अण्णा जाधव, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे, सचिव मंदा डोंगरे, शिवशाहीर विक्रम अवचिते, प्रतिभा डोंगरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.