Breaking News

राहुल धनवटे खून खटल्यातील सर्व आरोपी निर्दोष



 नेवासे/ प्रतिनिधी
 नेवासाफाटा येथील हॉटेल मारवाड जवळ राहुल धनवटे याचा खून केला होता. यातील सर्व आरोपींची नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम.तापकिरे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
 या घटनेची माहिती अशी की:  १ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नेवासाफाटा येथील हॉटेल मारवाड जवळ राहूल धनवटे व त्यांचे मित्र व आरोपी यांच्यात मागील कारणावरून हाणामारी झाली होती. त्या हाणामारीत राहुल धनवटे याचा मृत्यू झाला होता. यामध्ये रवी भालेराव, पप्पू सोनकांबळे, विकी कांबळे, शिवा साठे, पप्पू इंगळे, शंकर काळे, निकील चंदाणी, रवी शेरे, सतीश चक्रनारायण, बबलू साळवे यांनी राहुल धनवटे यास मारहाण करून त्यास जीवे मारले अशी फिर्याद नेवासा पोलिस ठाण्यात मयूर राजेंद्र वाघ यांनी दिली होती.
 सदर खटल्याची सुनावणी नेवासा येथील सेशन केस क्र.३५/१७  प्रमाणे अतिरिक्त न्यायाधीश एस.एम. तापकीरे यांच्या समोर झाली. सदर दोषपत्रात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनास्थळ, पंचनामा असे इतर पंधरा साक्षीदारांची साक्ष ही सरकारी पक्षाकडून नोंदविण्यात आली. यावेळी दोषारोप पत्रातील कागदपत्रे व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती ही आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करून न्यायालयाच्या  निदर्शनास आणून दिली. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम.तापकीरे यांनी सर्व आरोपींची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. या खटल्यातील निकालाकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते. सदर खून खटल्यातील आरोपींच्या वतीने अँड.बी.बी. औताडे, अँड.रविंद्र भोसले, अँड.रोमन सय्यद, अँड.एजाज पठाण, अँड.डी. बी.देशमुख, अँड.जावेद इनामदार यांनी काम पाहिले.