Breaking News

माजी सैनिकांकडून थंडीत कुडकुडणार्‍यांना मायेची ऊब! जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचा उपक्रम


अहमदनगर / प्रतिनिधी
राज्यात सर्वत्र कडाक्याच्या थंडीची लाट पसरलेली असताना नगर शहरात तर तापमान घटले आहे. अशा कडाक्याच्या थंडीत माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत शहरातील सर्व बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या गोरगरीबांना ब्लँकेटचे वाटप करुन मायेची ऊब दिली.
भीक मागून पोट भरणार्या गोरगरीबांना राहण्यासाठी निवारा नसल्याने ते रस्त्याच्या कडेला, बसस्थानक रेल्वे स्टेशन परिसरात उघड्यावर झोपलेले गोरगरीब नागरिक, तर थंडीत एखादी जुनी चादर अंगावर घेऊन कुडकुडणार्या शेकोटीचा आधार घेत कशीबशी रात्र काढतानाचे चित्र दिसून आले. माजी सैनिकांनी थंडीत कुडकुडणार्या नागरिकांच्या अंगावर उबदार पांघरुन दिले. मायेने मिळालेल्या या पांघरुणाने गरजू भारावले. तर काहीचे डोळे पाणवले. सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्यांचा हा उपक्रम पाहून नागरिकांनी त्यांचे कौतुक करुन जवान हेच देशाचे खरे हिरो असल्याची भावना व्यक्त केली.
जयहिंद फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, कुशल घुले, बन्सी दारकुंडे, मदन पालवे, महादेव शिरसाठ, ॅड. संदीप जावळे, भाऊसाहेब देशमाने, संजय पाटेकर, सुनिल गुंजाळ, संजय आठरे, संतोष शिंदे, निवृत्ती भाबड, मच्छिंद्र रसाळ, दुशांत घुले, भगवान डोळे, भास्कर सिनारे,  विदेश पोटे, संग्राम पालवे, राठोड आदी यावेळी उपस्थित होते.