Breaking News

आवडीच्या क्षेत्रात मुलांना प्रोत्साहन द्या : हराळ


अहमदनगर / प्रतिनिधी
बँकेत बॅलन्स करण्याऐवजी मुलांमध्ये संस्काराचे बॅलन्स केल्यास भविष्यकाळ उज्वल असणार आहे. मुलांच्या भविष्यासाठी पालक पैशांच्या मागे धावून बँक बॅलेन्स करतात. मात्र त्यांच्यावर संस्कारक्षम ज्ञानाची रुजवण झाल्यास जमवलेली संपत्ती व्यर्थ ठरते. प्राथमिक शिक्षण हे उज्वल भवितव्याचा पाया असून, ते भक्कम केल्याशिवाय पुढील ध्येय साध्य करता येणार नाही. मुलांसाठी भरपूर करिअरच्या वाटा असून, त्यांना आवड असलेल्या क्षेत्रात प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जि. . उपशिक्षणाधिकारी रामदास हराळ यांनी केले.
नगर तालुक्यातील वाळूंज येथील सबाजीराव गायकवाड कृषी विकास प्रतिष्ठान संचलित पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी उप शिक्षणाधिकारी हराळ बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष कृषिभूषण सबाजी गायकवाड, छायाताई गायकवाड, प्राचार्या सोनल गायकवाड, कमल टेमकर, प्राथ.मुख्यध्यापिका रुथ नायडू, ओम गायकवाड, अर्चना म्हस्के, विद्यालयाचे समन्वयक शिवाजी मोरे, नाना भांबरे, भाऊसाहेब रोहोकले आदी उपस्थित होते.
पुढे हराळ म्हणाले, की मुलांना शिक्षण देत असताना त्यांना आपण करीत असल्याचे कष्टाची जाणीव असू द्या. इंग्रजी शिक्षण ही सध्याची गरज असून, पालकांनीदेखील जागृक राहून मुलांना वेळ देण्याची गरज आहे. बळजबरीचे घोकंपट्टीचे शिक्षण देण्याऐवजी आनंदी वातावरणात शिक्षण दिल्यास सक्षम विद्यार्थी घडणार असल्याचे सांगून, मुलांच्या सकस आहाराकडे लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी ढोल, लेझीम झांज पथकासह पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. लेझीम पथकाने सादर केलेल्या विविध कवायतीने उपस्थितांचे लक्ष वेधले. प्रास्ताविकात प्राचार्या सोनल गायकवाड यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. पाहुण्यांच्या हस्ते कला, क्रीडा शैक्षणिक क्षेत्रात नैपुण्य मिळविणार्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी कार्यक्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव लिंभोरे आणि मनिषा नागपूरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपा चांदेकर, वंदना बोरुडे, स्मिता क्षीरसागर, चव्हाण, गणेश झरेकर, प्रियंका मोरे, रुपाली राऊत, सीमा मोरे, सुप्रिया शिंदे, स्मिता नागपूरे, मोईन शेख आदी शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. गंगाधर पिल्ले यांनी आभार मानले.