Breaking News

वाडिया पार्क येथे युनाईटेड सिटी क्रिकेट स्पर्धा

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील युनाईटेड सिटी हॉस्पिटलच्या वतीने शहरात प्रथमच युनाईटेड सिटी डॉक्टर्स प्रिमियर लिगचे आयोजन करण्यात आले. क्रिकेट खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून 22 संघांचा सहभाग असणार आहे. यात सुमारे 150 ते 200 खेळाडू सहभागी होतील. स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मंगळवारी (दि.21) सकाळी 11 वा. होणार आहे.
पहिल्या गटात युनाईटेड सिटी, आयकॉन -2, पोनी मोटर्स, संजय नाईट रायडर, नॉन स्टॉप, सरपंच-11, साई संघर्ष युवा प्रतिष्ठान, एमआर-11, नमोह, केडगाव सीसी, किंग बेकर्स  तर दुसर्‍या गटात पोलिस प्रशासन संघ, पत्रकार संघ, डॉक्टर्स संघ, इंजिनिअर संघ, जिल्हा परिषद संघ, नगरसेवक संघ, वकील संघ, शिक्षक संघ, ज्येष्ठ नागरिक संघ, आर्मी-11 यांचा समावेश असणार आहे. या दोन्ही गटात रोज सकाळी 7.30 ते सायं. 6.30 पर्यंत हे सामने होणार आहेत.
या सर्व मॅचेस वाडिया पार्क येथे होणार असून, प्रथम बक्षीस 41 हजार रुपये, ट्रॉफी, प्रमाणपत्र, द्वितीय - 31 हजार रुपये व तृतीय 21 हजार रुपये, चतुर्थ रुपये 11 हजार रुपये बक्षिसे असणार आहेत, असे युनाईटेड सिटी हॉस्पिटलचे संचालक व मुख्य आयोजक डॉ.इमरान शेख यांनी सांगितले.