Breaking News

गणेश जयंतीनिमित्त एकदंत कॉलनीत कार्यक्रम

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील दातरंगे मळा परिसरातील एकदंत कॉलनीत गणेश जयंती उत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक, सामुदायिक विवाह, आरोग्य शिबिराबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाचा एकदंत गणेश जन्मोत्सव 28 जानेवारीस असून गुरुवार (दि.23) पासून दीपप्रज्वलनानंतर रात्री 8  ते 11 पर्यंत हनुमान चालिसा (श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ, नवीपेठ). शुक्रवारी (दि.24) सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मोफत आरोग्य  शिबीर, शनिवारी (दि.25) सकाळी 10 ते दु. 4 पर्यंत रक्तदान शिबीर, रात्री 7 ते 9  हळदी कुंकू समारंभ, रविवार (दि.26) रात्री 7 वाजता मनोरंजन कार्यक्रम
, सोमवारी (दि.27) रात्री 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
गणेश जयंतीदिनी शुक्रवारी (दि.28) स.7 ते 9 विघ्नेश्‍वर पूजन, सकाळी 9 ते 10.30 होमहवन, सकाळी 9 ते दुपारी 12 मूर्ती मिरवणूक व पुर्णाहुती, सकाळी 10 ते दुपारी 1 सत्यनारायण, दुपारी 1.वा.21 मि. सामुदायिक विवाह मुहूर्त, दुपारी 1.30 ते 3 महाप्रसाद (भंडारा), दुपारी 4 ते  सायंकाळी 7 यावेळेत गंमत जंमत व बाल मेळावा, असे कार्यक्रम होतील. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकदंत गणेश मंडाळच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.