Breaking News

सागर चाबुकस्वार यांना समाजरत्न पुरस्कार

भिंगार/प्रतिनिधी : येथील वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष व पंचशील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांना स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा सप्ताह व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त देण्यात येणारा समाजरत्न पुरस्कार नुकताच निमगाव वाघा या ठिकाणी जि.प. सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी नवनाथ सेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भागचंद जाधव, नानासाहेब डोंगरे, बाबासाहेब तनपुरे, संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष संतोष धीवर, बाळा
साहेब भिंगारदिवे, प्रल्हाद भिंगारदिवे, अच्युत गाडे आदी उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल चाबुकस्वार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे