Breaking News

एकल जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी सुभाष तांबे

अहमदनगर/प्रतिनिधी : प्राथमिक शिक्षकांच्या संघटनेच्या राज्याध्यक्ष नरसाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिक्षण परिषद व धोरणात्मक बैठकीत पारनेर तालुक्यातील गाजदीपूर येथे कार्यरत असलेले सुभाष तांबे यांची नगर जिल्हा एकल शिक्षक मंचच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. 
यावेळी दत्तात्रय रेपाळे (जिल्हाध्यक्ष उच्चाधिकार), जिल्हा मार्गदर्शक बबनराव आढाव , जिल्हा कोषाध्यक्ष मारुती साबळे, जिल्हा नेते परशुराम ठोंबरे,  पारनेर तालुकाध्यक्ष संजय रेपाळे, रोहिदास वाबळे, अनिल इकडे, भास्कर औटी, विशाल उमाप, अमोल दळवी, बाप्पू औटी, आर.डी.वाळुंज, गायकवाड, दिलीप जगदाळे, बाळासाहेब दिघे, रावसाहेब वाळुंज, आप्पासाहेब बेरड, संतराम दळवी आदी उपस्थित होते.