Breaking News

डॉ. दीपक हारके यांना चित्रपट अभिनेत्री उर्मिला मार्तोडकर यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट पुरस्कार


अहमदनगर / प्रतिनिधी
नवीदिल्ली येथील इस्ट ऑफ कैलाश येथील आर्य ऑडिटोरियममध्ये चित्रपट अभिनेत्री उर्मिला मार्तोडकर यांच्या हस्ते प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ. दीपक हारके यांना सर्वोत्कृष्ट ध्यानधारणा प्रशिक्षकासाठी 'इंडियन ग्लोरी अवॉर्ड २०२०' प्रदान करून गौरविण्यात आले
यावेळी नागठाणे येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ध्यानधारणा  प्रशिक्षिका ब्रह्माकुमारी सुवर्णा नवीदिल्ली येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ध्यानधारणा  प्रशिक्षिका ब्रह्माकुमारी ज्योती  उपस्थित होत्याडॉ. हारके यांनी नवीदिल्ली येथील ईस्ट ऑफ कैलाश येथील आर्य ऑडिटोरियममध्ये साशा मीडिया अँड एंटरटेनमेंटतर्फे 'सर्वात मोठी रांगोळी', 'सर्वात मोठे शुभेच्छा पत्र',  'सर्वात मोठे वर्तमानपत्र', 'सर्वात मोठी पतंग', 'सर्वात मोठे पोस्ट कार्ड', 'सर्वात मोठे अंतर्देशीय पत्र, 'सर्वात मोठे पॅम्प्लेट, 'सर्वात मोठी ट्रॉफी', 'सर्वात मोठे पुस्तक', 'सर्वात मोठा वेडिंग बुक', 'सर्वात मोठे फुलांचे शिवलिंग', 'सर्वात छोटी राखी', 'सर्वात छोटे कमळ', 'सर्वात छोटे बॅडमिंटन रॅकेट', 'सर्वात मोठा गुलाबांचा गुच्छ' या सारखे १७२ विश्वविक्रम करून  भारताच्या प्राचीन राजयोगाचा डॉ. हरके प्रसार करत आहेत. गेल्या ३० वर्षांपासून वेगवेगळ्या विश्वविक्रमी उपक्रमातून भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार करून १७२ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय बनल्याबद्दल प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ. हरके यांना हा पुरस्कार देण्यात आला.