Breaking News

माजी मुख्यमंत्र्यांनी घेतले शनिदर्शन फडणवीस यांचा देवाला अभिषेक


सोनई/प्रतिनिधी ः
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री 10च्या सुमारास शनिशिंगणापूर येथे शनिदर्शन घेतले. त्यांनी शनिदेवाला तेलाने अभिषेक केला.
      माजीमंत्री एकनाथ खडसे यांनीही सकाळी 11च्या सुमारास  शनिदेवाचे दर्शन घेतले. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रात्री 10 च्या सुमारास शनिचरणी हजेरी लावली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा  केली होती. त्यांच्या कारकिर्दीत शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या विश्‍वस्त मंडळाची नेमणूक होईल, अशी अपेक्षा होती. परंतु ती झाली नाही.
शनिदर्शनानंतर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच बाळासाहेब बानकर, बाळासाहेब कुर्‍हाट यांनी तर देवस्थानच्या वतीने योगेश बानकर व आदीनाथ शेटे यांनी फडणवीस यांचा सन्मान केला. यावेळी महेश डिके, नामदेव साबळे, विकास बानकर आदी उपस्थित होते.